Pune News: पुणे महापालिकेच्या कारभारालाच भगदाड; अनेक ठिकाणी गळती; कोट्यवधी रुपये खर्चूनही वाहिन्या नादुरुस्त

Pune Civic Body Under Scanner Over Repeated Pipeline Leakage: दुरुस्तीवर कोट्यवधींचा खर्च, तरीही पाणीगळती थांबेना; पुणे महापालिकेच्या कारभाराचे वास्तव काय?
Pune Municipal Corporation Pipeline Repairs Under Scanner as Leaks Continue in Several Areas Despite Crores of Rupees Spent

Pune Municipal Corporation Pipeline Repairs Under Scanner as Leaks Continue in Several Areas Despite Crores of Rupees Spent

sakal

Updated on: 

पुणे: शहरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांपर्यंत (एसटीपी) पोहोचविणाऱ्या मोठ्या व्यासाच्या वाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, अनेक ठिकाणी वाहिन्यांना भगदाड पडल्याने सांडपाणी एसटीपीपर्यंत पोहोचण्याऐवजी थेट नदीत मिसळत असल्याचे वास्तव ‘सकाळ’ने समोर आणले होते. त्यानंतर प्रशासनाने दुरुस्तीची कामे सुरू केली. मात्र, संपूर्ण वाहिन्यांचे सर्वेक्षण न करताच मोजक्याच ठिकाणी दुरुस्ती करून पाठ थोपटून घेण्याचे काम केले जात आहे. मलनिःसारण विभागाचा कारभार चव्हाट्यावर आल्यानंतरही त्यात गांभीर्याने सुधारणा केली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Loading content, please wait...