

Shiv Sena submits 140 AB forms
esakal
Pune municipal corporation election 2025: पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला. मात्र महायुतीत असलेल्या शिवसेना-भाजपचं काही जुळलं नाही. त्यामुळे अखेरच्या क्षणी शिवसेनेने १३५ ते १४० जणांना एबी फॉर्म वाटल्याची माहिती आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या १५ जणांची यादी शिवसेनेने भाजपकडे दिली होती. ती नावं वाचून युतीची चर्चा बंद झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. ती यादी 'साम टीव्ही'च्या हाती लागली आहे.