Rising Rebellion Ahead of Pune Municipal Elections
sakal
पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षाकडून इच्छुकांची संख्या मोठी असल्याने निवडून येण्यास योग्य असलेल्या इच्छुकाला उमेदवारी मिळाली आहे. मात्र, त्यामुळे नाराज झालेल्या इच्छुकांनी अपक्ष किंवा पक्षाच्या नावाने अर्ज भरून बंडखोरीचे संकेत दिले आहेत. त्यांना शांत करण्यासाठी सर्वच पक्षातील नेत्यांचा खटाटोप सुरु झाला आहे. त्यात आता किती यश येणार याचे चित्र शुक्रवारी (ता. २) स्पष्ट होणार आहे. यात यश न आल्यास बंडखोरीचा सर्वाधिक फटका भाजपला बसणार आहे.