Pune Election : तृतीयपंथी नागरिकांसाठी मतदान जनजागृती कार्यक्रम; धनकवडी–सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाचा उपक्रम!

Third Gender Inclusion : पुणे महापालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर धनकवडी–सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयातर्फे तृतीयपंथी नागरिकांसाठी विशेष मतदान जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. लोकशाही प्रक्रियेत शंभर टक्के सहभाग साधण्याचा यामागील मुख्य उद्देश होता.
Third Gender Citizens Take Active Part in Electoral Process

Third Gender Citizens Take Active Part in Electoral Process

Sakal

Updated on

आंबेगाव : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर मतदारांचा सहभाग वाढावा आणि सर्व घटकांना मतदान प्रक्रियेत सामावून घेता यावे, या उद्देशाने धनकवडी–सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने विशेष मतदार जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवार  (ता.९) आबा बागुल उद्यान येथील पंडित भीमसेन जोशी सभागृहात तृतीयपंथी नागरिकांच्या सहभागातून मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com