Pune Municipal Election
esakal
PMC Election Result: पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २५ येथील मतमोजणी केंद्रावर शुक्रवारी मतमोजणीदरम्यान प्रचंड गोंधळ उडाल्याची घटना घडली. मतमोजणी (PMC Election Results) सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रूपाली ठोंबरे या आक्रमक झाल्या असून, मतमोजणीसाठी वापरण्यात येणाऱ्या मशीनमध्ये बदल करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.