

Election Campaign Meetings Now Chargeable in Pune
Sakal
पुणे : निवडणुकीच्या प्रचारासाठी सभा किंवा कोपर सभा घेताना महापालिकेच्या मैदानाचा किंवा अन्य जागेचा वापर केल्यास उमेदवारांना, राजकीय पक्षांना त्यांची किंमत मोजावी लागणार आहे. महापालिकेने निश्चित केलेल्या दरानुसार चौक सभेसाठी १८ हजार तर कोपरा सभेसाठी ७ हजार २०० रुपये शुल्क घेतले जाणार आहे. जर विनापरवानगी सभा घेतली तर दीड पट दंडासह रक्कम वसूल केली जाणार असल्याने ही चूक उमेदवाराला महागात पडणार आहे.