

Pune municipal election permit deposit refund process
sakal
पुणे : महापालिकेच्या निवडणुकीत सभा, कोपरा सभा यासह अन्य कामासाठी परवाने देताना अनामत रक्कम स्वीकारण्यात आली होती. ही रक्कम आता परत घेऊन जा असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले असून, त्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली आहे. निवडणुकीच्या काळात महापालिकेला जागा भाड्याने दिल्याने ४४ लाख ८३ हजार ७९३ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर ९ लाख ८ हजार ३४० रुपयांची अनामत रक्कम मिळाली आहे.