

Over 9,000 Objections Filed Against Draft Voter List
sakal
पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकत घेण्यासाठी अजून दोन दिवस शिल्लक आहेत. आजपर्यंत प्रारूप मतदार यादीवर तब्बल ९ हजार ३७० हरकती दाखल झाल्या आहेत. ही संख्या दोन दिवसात मोठ्याप्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे. शहरात एकूण ३५ लाख ५१ हजार ४६९ मतदार आहेत. त्यामध्ये ३ लाख ४४६ नावे दुबार असल्याचे समोर आले आहेत.