

Strong Interest in Pune Municipal Elections
Sakal
पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज केवळ आठ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. तर गेल्या दोन दिवसात १५ क्षेत्रीय कार्यालयांमधून ६ हजार ४३७ नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली आहे. तर आत्तापर्यंत एकूण ९ हजार १०१ अर्जांची विक्री झाली आहे. उमेदवारी जाहीर होताच अर्ज भरताना कोणतीही गडबड नको, त्यासाठी इच्छुकांनी आत्ताच अर्ज खरेदी करून ठेवले आहेत.