

Pune Municipal Election Zero Seats For Shinde Sena And MNS
Esakal
Pune Municipal Election Result : पुणे महानगरपालिकेत भाजपनं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला चारीमुंड्या चीत करत सत्ता मिळवली. मात्र यात सध्या चर्चा सुरू आहे ती शिवसेना शिंदे गट आणि मनसेची. या दोन्ही पक्षांना खातंही उघडता आलेलं नाही. शिवसेना फुटीनंतर पक्षचिन्ह आणि नावासह महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शिंदेंना पुण्यात मोठा धक्का बसला आहे. ११९ उमेदवार मैदानात उतरवलेल्या शिवसेनेला एकही जागा जिंकता आलेली नाही.