Pune Municipal Corporation Election Results
esakal
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या फेरीतील निकाल हाती आले आहेत. या पहिल्या कलामध्ये प्रभाग क्रमांक २० — शंकर महाराज मठ, बिबेवाडी प्रभागातून भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून भाजपने सुरुवातीपासूनच आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.