Pune Municipal Election Results 2026 : पुण्यात भाजपची मोठी आघाडी, तब्बल 'इतक्या' जागांवर पुढे, राष्ट्रवादीची स्थिती काय?

Pune PMC Results : २०१७ प्रमाणेच यंदाही भाजप बहुमताच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे ट्रेंड्स दर्शवतात. १५ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या मतदानात पुण्यात ५४.५% मतदान नोंदवले गेले. सुरुवातीच्या कलांनुसार पुण्यात भाजपची स्पष्ट ‘लाट’ पाहायला मिळत आहे.
Pune Municipal Election Results 2026

BJP supporters celebrate as the party takes a strong early lead in the Pune Municipal Corporation Election Results 2026

esakal

Updated on

PMC Election Result: पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ चे पहिले कल समोर आले आहेत. एकूण १६५ जागांसाठी झालेल्या या भाजपने ने पुण्यात मजबूत आघाडी घेतली आहे.प्राथमिक माहितीनुसार भाजप सध्या पुण्यात ४८ जागांवर आघाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) १२ जागांवर आघाडीवर आहे.काँग्रेस ० जागांवर आघाडीवर आहे.इतर पक्ष आणि अपक्षांची स्थिती अद्याप स्पष्ट होत नाहीये, पण भाजपची मजबूत पकड दिसत आहे.

भाजप कार्यकर्ते आणि नेते यांच्या म्हणण्यानुसार, ही आघाडी पुण्यातील त्यांच्या विकासकामांचे आणि जनाधाराचे प्रतिबिंब आहे. अंतिम निकाल येण्यापर्यंत ही स्थिती बदलू शकते, पण सध्या पुणे महानगरपालिकेत भाजपची मजबूत स्थिती दिसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com