
पुणे : महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप रचना सोमवारी (ता. ४) महापालिका प्रशासनाने राज्य सरकारच्या नगरविकास विभागाला सादर केली. ३२ गावांच्या समावेशामुळे प्रभागरचनेत मोठे बदल झाल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, त्याचवेळी २०१७ ची प्रभागरचना प्रमाण मानून २०२५ची रचना याच पद्धतीने केल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.