
पुणे : पुणे महापालिकेची प्रारूप प्रभागरचना तयार करून ती राज्य सरकारला सादर करण्याची मुदत जवळ आलेली असताना राजकीय पुढाऱ्यांची धाकधूक वाढलेली आहे. स्वतःच्या सोयीची अशी प्रभागरचना व्हावी, यासाठी उच्च पातळीवरून खटाटोप सुरू आहेत. विकासकामांच्या बैठकांच्या निमित्ताने प्रभागरचनेवर चर्चा करण्याचा घाट घातला जात आहे. आज (ता. ३१) भाजपचे आमदार व पदाधिकाऱ्यांची आयुक्तांसोबत बैठक झाली, तर महाविकास आघाडीचे पदाधिकारी उद्या (ता. १) आयुक्तांची भेट घेणार आहेत.