पुणे महापालिकेने सुविधा दिल्या तरच कर द्या - आपची मागणी

पुणे महापालिकेमध्ये मिळकत कर आकारणीची पद्धत बदलून ती भांडवली मूल्यावर आकारणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
Aap Party
Aap PartySakal
Summary

पुणे महापालिकेमध्ये मिळकत कर आकारणीची पद्धत बदलून ती भांडवली मूल्यावर आकारणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

पुणे - पुणे महापालिकेमध्ये मिळकत कर आकारणीची पद्धत बदलून ती भांडवली मूल्यावर आकारणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. प्रायोगिक तत्त्वावर याचा अभ्यास करताना सुविधांचा विचार केला जाणार आहे. पण सुविधांचा विचार करताना ‘महापालिकेने पुरविलेल्या सुविधांचा विचार झाला पाहिजे. जर सुविधा दिल्या जात असतील तरच कर घेतला पाहिजे. या अर्थाने भांडवली मूल्यानुसार कर निश्‍चीत होणे आवश्‍यक आहे, अशी मागणी आम आदमी पक्षाचे राज्य संघटक व कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी केली आहे.

ज्या सोसायट्यांमध्ये जलतरण तलाव, क्रीडांगण, सभागृह, जिम, हॉटेल, क्रीडांगण व इतर सुविधा आहेत त्यांचा अभ्यास करण्यात येणार आहे व या सुविधांची वर्गवारी करून कर आकारणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा प्रकार पचनी न पडणारा आहे. नागरिकांना स्वतः: निर्माण केलेल्या सुविधा मिळत आहेत म्हणून त्यांना कर आकारणी जास्त करायची हा प्रकार काहीसा विचित्र वाटतो. महापालिकेने नागरिकांना कर आकारणी करताना पालिकेने त्यांना काय सुविधा दिली आहे यावर कर आकारणी केली पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्या सोसायटीमध्ये पालिका पाणी पुरवू शकत नाही परंतु त्या सोसायटीमध्ये स्वतःचे बोअरवेल आहे, जिम, क्रीडांगण , आसपास कुठेतरी पंचतारांकित हॉटेल आहे म्हणून त्यांना जास्त कर आकारणी करायची हे योग्य वाटत नाही. महापालिकेचा आजपर्यंतचा लौकिक पाहता काहीही शक्य आहे. त्यामुळे नागरीकांनी सावध राहावे असे आवाहन कुंभार यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com