Pune News : ४४६ खड्‌डेच बुजवायचे बाकी; पुणे महापालिका पथ विभागाकडून दावा

प्रशासनाने ९० टक्के खड्डे बुजविल्याचा दावा केला असला तरी प्रत्येक रस्त्यावर खड्डे दिसून येत आहेत.
pune Municipal Road Department Claim Only 446 pits remain to buried
pune Municipal Road Department Claim Only 446 pits remain to buried sakal
Updated on

पुणे : शहरातील बहुतांश भागांतील रस्‍त्यांवर खड्डे पडून वाहनचालक त्रस्त झाले आहेत. अशावेळी १ जून ते २६ जुलै या ५६ दिवसांच्या कालावधीत १६ हजार ७४७ खड्डे बुजविले, बुधवारी दिवसभरात ३९ खड्डे बुजविले, आता एकूण १७ हजार १९३ पैकी केवळ ४४६ खड्डे बुजवायचे बाकी आहेत, असे दावे पुणे महापालिकेच्या पथ विभागाने केले.

pune Municipal Road Department Claim Only 446 pits remain to buried
Pune Rain Update : पुण्याच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट तर शहरात मध्यम पाऊस

प्रशासनाने ९० टक्के खड्डे बुजविल्याचा दावा केला असला तरी प्रत्येक रस्त्यावर खड्डे दिसून येत आहेत. पावसाळ्यात यंदा शहरातील रस्त्यांची स्थिती चांगली असेल अशी ग्वाही महापालिकेकडून दिली जात होती. त्यासाठी ३०० कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली, पण आतापर्यंत केवळ ४८ किलोमीटर रस्त्यांचे काम झाले.

pune Municipal Road Department Claim Only 446 pits remain to buried
Pune Potholes : पावणे सतरा हजार खड्डे बुजविल्याचा पुणे महापालिकेचा दावा

पथ विभागाने देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर प्रत्येकी दोन कोटी रुपयांची निविदा खड्डे बुजविण्यासाठी काढली. त्यातून खड्डे बुजवून नागरिकांना दिलासा मिळण्याची आशा होती, पण खड्डे अद्याप बुजलेले नाहीत. उलट पावसामुळे खड्ड्यांची संख्या वाढली आहे.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काही दिवसांपूर्वी पथ विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सात दिवसांत सर्व खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पथ विभागाने या कामाला गती देण्याचा प्रयत्न केला, पण अजूनही अनेक भागांत खड्डे आहेत.

pune Municipal Road Department Claim Only 446 pits remain to buried
Pune News : लग्नानंतर आठवडाभरातच कारागृह कर्मचाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या

भर पावसात डांबरीकरण

धायरी येथील स्मशानभूमीच्या समोरील रस्त्यावर मुसळधार पाऊस सुरू असताना ठेकेदाराने डांबर टाकून त्यावर रोडरोलर फिरवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

रस्ता वाहून गेल्याने पेव्हिंग ब्लॉक

सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने माणिकबाग भागात एका महिन्यापूर्वी डांबरीकरण करून खड्डे बुजविण्यात आले होते. पण हा रस्ता पावसात वाहून गेला, अनेक खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे मंगळवारी रात्री वाहतूक बंद करून या ठिकाणी प्रशासनाने पेव्हिंग ब्लॉक बसवून रस्ता दुरुस्त केला आहे.

शहरात अजूनही खड्डे आहेत, ते कामही लवकरच पूर्ण केले जाईल. नागरिकांना दिलासा देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.