
Pune Municipal Schools
sakal
पुणे : महापालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. यापूर्वी महापालिकेने शहरातील १५ शाळा ‘आदर्श शाळा’ केल्या, त्यानंतर आता शहरातील ७५ शाळा ‘आदर्श’ करण्यासाठी महापालिकेने पाऊल उचलले आहे. महापालिकेसह शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील शाळांचाही त्यानिमित्ताने विकास केला जाणार आहे. शाळांचा दर्जा सुधारण्याकडे लक्ष देतानाच, महापालिका प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीवरही भर दिला जाणार आहे.