

250 Temporary Teachers in Pune Continue Teaching Without Salary
Sakal
पुणे : पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने सप्टेंबर २०२५ मध्ये जवळपास २५० हंगामी शिक्षण सेवकांची नियुक्ती केली. परंतु, दोन महिने उलटून गेले तरी अद्याप या शिक्षण सेवकांना पगार देण्यात आलेला नाही. परिणामी, शिक्षण सेवकांवर पगाराविना शिक्षण सेवा करण्याची वेळ आली आहे. महापालिकेच्या या हंगामी शिक्षण सेवक भरतीमध्ये मराठी माध्यमातील जवळपास २०० आणि इंग्रजी माध्यमातील ५० हंगामी शिक्षण सेवकांचा यात समावेश आहे. या शिक्षण सेवकांना सहा महिन्यांच्या करार तत्त्वावर दरमहा वीस हजार रुपये या मानधनावर नियुक्त केले आहे.