Pune : व्रतबंध-एक विद्याव्रत प्रदर्शनास आजपासून प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Munj Ceremony tradition

Pune : व्रतबंध-एक विद्याव्रत प्रदर्शनास आजपासून प्रारंभ

पुणे : हिंदू धर्मातील संस्कारक्षम महत्त्व असलेल्या ‘मुंज’ या संस्कारामागची परंपरा, धर्मिक महत्त्व उलगडण्याबरोबरच या सोहळ्यातील सेवा-सुविधांची माहिती देणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या ‘व्रतबंध- एक विद्याव्रत’ या अनोख्या दोन दिवशीय प्रदर्शनास शुक्रवारपासून (ता. ४) पुण्यात प्रारंभ होत आहे. रमेश पाटणकर इव्हेंट्स आणि ‘सकाळ माध्यम समूह’ यांनी हे प्रदर्शन आयोजित केले आहे.

उपनयन संस्कार असलेला हा मुंज सोहळा नेमका आहे तरी काय, मुंज का करावी, कशी करावी, कोणी करावी, त्याचे फायदे काय अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळावीत, या उद्देशाने हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. मुलींच्या मुंजी, सर्व समाजातील मुंजी, तसेच सामुदायिक मुंजी करण्याच्या संस्कारक्षम उपक्रमाची माहितीही यावेळी दिली जाईल. प्रदर्शनाचे उद्‍घाटन अभिनेत्री स्नेहल प्रवीण तरडे यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता होणार आहे. यावेळी ‘सिद्धी बँक्वेट’च्या संचालिका अरुणा ढोबळे उपस्थित राहणार आहेत.

प्रदर्शनाची वैशिष्ट्ये

मुंजीचे विविध संस्कारक्षम देखावे एकाच ठिकाणी पाहायला मिळतील.

उपनयन संस्काराचे विविध पैलूंचे आणि पारंपरिक सोहळ्यांचे महत्त्व लक्षात यावे.

पुढील पिढीपर्यंत संस्कार पोचावेत.

येत्या काळात मुंजीचे अनेक मुहूर्त असल्यामुळे संस्कारांबरोबरच नव्या सुविधांची माहिती उपलब्ध.

सामूहिक मुंजींसारख्या योजनांची माहिती मिळणार.

मुंजींबद्दलचे अनुभव नागरिकांपुढे मांडणार.

रुखवत वस्तू, रुखवत देखावे, बटूचे पेशवाई पोशाख, फेटे, पगड्यांचे प्रदर्शन. आईसाठी पारंपरिक दागिने, मुंजीच्या संकल्पनेप्रमाणे पेहराव.

मुंजीच्या संस्कारांचे नाट्यपूर्ण सादरीकरण.

‘व्रतबंध - एक विद्याव्रत’ विषयावर अभ्यासपूर्ण आणि उद्‌बोधक परिसंवाद.

पारंपरिक खाद्यपदार्थांचा आस्वादही घेता येणार.

‘व्रतबंध- एक विद्याव्रत’ प्रदर्शन कुठे? :

सिद्धी बँक्वेट, एरंडवणे

कधी? : ४ आणि ५ नोव्हेंबर

(प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य)