Pune : खुनी हल्ल्यातील फरारी आरोपींना पाठलाग करून पकडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Pune : खुनी हल्ल्यातील फरारी आरोपींना पाठलाग करून पकडले

जुन्नर : (दत्ता म्हसकर) येथील खुनी हल्ल्यातील तीन फरारी आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व जुन्नर पोलीसांच्या पथकाने सिनेस्टाईलने पाठलाग करत खेडशिवापुर येथ गुरुवारी ता.२९ रोजी एका ट्रॅव्हल्समधून ताब्यात घेतले आहे. शिरोली बुद्रुक ता.जुन्नर येथील फरारी आरोपी अक्षय मोहन बोऱ्हाडे वय २७ त्याचे साथीदार सुदर्शन शिवाजी विधाटे वय.२६ व विजय प्रकाश बोचरे वय.२९ अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे असून पुढील कार्यवाही जुन्नर पोलीस करत आहेत.

याबाबतची हकीकत अशी की,जुन्नर येथील सुखप्रदा वडापाव सेंटरच्या गाडीवर शनिवार ता.२४ रोजी संतोष शंकर खोत सायंकाळी काम करत असताना अक्षय बोऱ्हाडे व त्याचे सात आठ साथीदार आले. जुन्या भांडणातून तुझा भाऊ बल्ली कोठे आहे असे विचारून दमदाटी केली. अक्षय बोऱ्हाडे याने चाकूने मारण्याचा प्रयन्त केला यावेळी मानेला जखम झाली. इतर साथीदारांनी गळ्यातील सोन्याची पाच तोळ्याची चेन व गल्ल्यातील सात हजार रुपये घेऊन पळून गेले होते.

संतोष याने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार सदर गुन्ह्याचा तपास करून आरोपींचा शोध घेऊन अटक करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला तसेच जुन्नर पोलीसांना दिल्या होत्या. गुन्ह्यातील आरोपी कोल्हापूर येथे असल्याचे गुरुवार ता. २९ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे समजल्याने स्थानिक गुन्हे शाखा व जुन्नर पोलीसांचे संयुक्त पथक कोल्हापूर येथे आरोपीला पकडण्यासाठी निघाले असता आरोपी साताऱ्याहून पुण्याकडे येत असल्याची बसतमी समजली. आरोपी प्रवास करत असलेल्या ट्रॅव्हल्सचा पाठलाग करत पहाटेच्या सुमारास खेड शिवापूरच्या हद्दीत तीनही आरोपीने ताब्यात घेतले.

यातील मुख्य आरोपी अक्षय मोहन बोऱ्हाडे याच्यावर जुन्नर पोलीस ठाण्यात सात तर आळेफाटा येथे एक असे आठ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांचे मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके व विकास जाधव पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार व गणेश जगदाळे, पोलीस हवालदार दिपक साबळे, राजू मोमीन अक्षय नवले,अभिमन्यू मोटे, अमोल शिंदे, किशोर जोशी यांनी ही कारवाई केली आहे.

अक्षय बोऱ्हाडे याच्यावर दाखल गुन्हे पुढील प्रमाणे :

१) जुन्नर पो.स्टे. गु.र.नं. ३३५/२०२१

भा.द.वि. कलम ३८७,३४

२) जुन्नर पो.स्टे गु.र.नं. ३३७/२०२१

भा.द.वि. कलम ४९८(अ), ४२०

हत्यार कायदा २५(३)

३) जुन्नर पो.स्टे गु.र.नं. ३४०/२०२१

भा.द.वि. कलम ३७०, ३२४,

३४१, ३२३

४) जुन्नर पो.स्टे गु.र.नं. ३४२/२०२१

भा.द.वि. कलम ३७६,५०४,५०६

५) जुन्नर पो.स्टे गु.र.नं. २२/२०१९

बाल न्याय अधि. २०१५ चे क ४२

६) आळेफाटा गु.र.नं. ३३८/२०१८

भा.द.वि. कलम ३९५, ३९७,

३६४, ४२७

प्रमाणे गुन्हे दाखल असून

१) जुन्नर पो.स्टे गु.र.नं. ३०६/२०२२

भा.द.वि. कलम ५००(२)

२) जुन्नर पो.स्टे गु.र.नं. ३१०/२०२२

भा.द.वि. कलम ३०७,३२७,१४३,

१४७,१४८,१४९,५०६