esakal | पुणे : अनैतिक संबंधातून मित्राचा कोयत्याने वार करून खून
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

पुणे : अनैतिक संबंधातून मित्राचा कोयत्याने वार करून खून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : अनैतिक संबंधातून मित्राचा कोयत्याने वार करून खून केल्याप्रकरणी आरोपी महिलेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांना हा आदेश दिला. शबनम हनिफ शेख ऊर्फ तन्वी राहुल वाघेला (वय ३०, रा. लोहगाव) असे जामीन फेटाळलेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी सनी ऊर्फ शन्नु सुदाम गाडे (वय २९), महम्मद शरीफहुसेन कुरेशी (वय २३) आणि सलीम मुर्तुजा शेख (वय ३६, सर्व रा. लोहगाव) यांना अटक केली असून सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. सुमीत दिलीप जगताप (वय ३४, रा. लोहगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस नार्इक गणपत सीताराम केंगले यांनी फिर्याद दिली आहे. लोहगावमधील ब्रम्हदेव नर्सरीजवळ तीन एप्रिल रोजी रात्री हा खून झाला.

आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून आरोपी अर्जदार महिलेचा त्यात सक्रिय सहभाग असल्याचे पुरावे मिळाले आहेत. खून होण्यापूर्वी सुमीत आणि चारही आरोपी हे एकत्र दारू पित असल्याचे दिसून आले आहे. आरोपी महिलेने सुमीत यास प्रथम लाकडी दांडक्याने मारहाण केली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. त्यामुळे तीचा जामीन अर्ज फेटाळावा, अशी मागणी सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी केली.

loading image
go to top