Pune Murder: तरुणाचा खून; 'त्या' माजी उपसरपंचाचा जामीन अर्ज फेटाळला

latest Pune News: जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. गुन्हा झाल्यापासून अर्जदार आरोपी फरार आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबामध्ये आरोपीचे नाव आलेले आहे.
Pune Murder Case
Pune Murder CaseSakal
Updated on

Pune Latest News: पेट्रोल चोरी केल्याच्या संशयावरून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याप्रकरणात नऱ्हेगावच्या माजी उपसरपंचाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा आदेश दिला.

सुशांत सुरेश कुटे (रा. चैतन्य बंगला, मानाजीनगर, नऱ्हे) असे जामीन फेटाळण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कुटे हा नऱ्हेगावचा माजी उपसरपंच आहे. समर्थ नेताजी भगत (वय २० वर्षे, रा. व्यंकटेश्वरा सोसायटी,अभिनव कॉलेज रोड, नऱ्हे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Pune Murder Case
Pune Accident: कार व दुचाकीचा भीषण अपघात, एक ठार व एक गंभीर जखमी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com