पुणे : मुक्यरमायकोसीस आजारावर शहरी गरीब योजनेतून होणार उपचार

पुणे महापालिकेचा रुग्णांना दिलासा
mucor-mycosis
mucor-mycosis File Photo

पुणे : म्युकरमायकोसीस (Myukarmycosis) सारख्या भयंकर आणि महागड्या रोगावर उपचार करताना रुग्णांच्या मदतीसाठी महापालिका (PMC) धावून आली आहे. या रुग्णांचा तीन लाखांपर्यंतचा खर्च महापालिकेच्या शहरीगरीब योजनेतून केला जाणार आहे. त्यामुळे पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ करणाऱ्या नातेवाइकांना दिलासा मिळाला आहे. तसेच महापालिकेच्या दळवी रुग्णालयात या आजारासाठी १५ बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. (Pune Myukarmycosis will be treated through urban poor scheme)

mucor-mycosis
पुणे : शहरात ७३ केंद्रांवर बुधवारी लसीकरण; ७,५०० डोस उपलब्ध

कोरोनातून बरे झालेल्या गंभीर रुग्णांना आता म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजारानं ग्रासलं आहे. यासाठी लागणारं इंजेक्शन व इतर औषधं अत्यंत महागडी आहेत. त्यामुळे या आजारावर उपचार घेताना सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला येत आहेत. महापालिकेतर्फे आर्थिक दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या शहरी गरीब योजनेंतर्गत पिवळं रेशनकार्ड आणि १ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांना एक लाखांपर्यंत तर काही दुर्धर आजारांसाठी २ लाखांपर्यंतची मदत केली जाते. ही मदत महापालिकेच्या पॅनेलवरील १४० रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना मिळू शकते.

mucor-mycosis
लहान मुलांसाठीच्या लसीकरणाची तयारी सुरु; DCGI चा मोठा निर्णय

म्युकर मायकोसिससाठी या योजनेंतर्गतच सर्वसामान्यांना उपचार मिळावेत यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी प्रशासनासोबत बैठक घेतली. यामध्ये उपचारांचा खर्च, औषधे याचा विचार करून ३ लाखांपर्यंतचा खर्च महापालिका करेल असा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल उपस्थित होत्या. यावेळी या आजारावर उपचारांसाठी महापालिकेच्या दळवी रूग्णालयात १५ बेड राखीव ठेवले जाणार आहेत. त्यासाठीचे नियोजनही तातडीनं करण्याचे आदेश प्रशासनास देण्यात आले आहेत.

mucor-mycosis
भारतात दोन टक्क्यांहून कमी लोकसंख्येला कोरोनाचा संसर्ग - केंद्र

"म्युकरमायकोसीस रोगावर उपचार करणाऱ्या रुग्णांना ३ लाखापर्यंत महापालिका मदत करणार आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना मोठा आधार लाभेल. तसेच दळवी रुग्णालयात १५ बेड राखीव असणार असून या उपचारासाठी लागणारी औषधे व नाक-कान-घसा तज्ज्ञांची या ठिकाणी नियुक्ती करण्याचे आदेशही प्रशासनाला दिले आहेत,’’ अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com