

Final Voters List Declared for 17 Urban Local Bodies
Sakal
पुणे : सुमारे साठ हजारांहून अधिक दाखल हरकतींवर सुनावणी पूर्ण करीत जिल्ह्यातील १४ नगर परिषदा आणि ३ नगरपंचायतींसाठी अंतिम मतदारयादी शुक्रवारी जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली. प्रत्येक हरकतींची दखल घेत पथके तयार करून स्थळ पाहणी करून संबंधितांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. त्यानंतर ही यादी प्रसिद्ध करण्यात आली, अशी माहिती जिल्हा प्रशासनातील नगरविकास विभागाचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी दिली.