
पुणे : देशात रेल्वे प्रवासाला नवे आयाम देणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रवास दिवसेंदिवस सुसाट होत आहे. देशात सद्यःस्थितीत ७३ लोहमार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. भारतीयांचा प्रवास सुखकर आणि गतिमान करणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचा महाराष्ट्रातला प्रवासदेखील वाढला आहे.