
Kalyani Komkar
esakal
गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या पूर्वसंध्येला नाना पेठेत झालेल्या धक्कादायक गोळीबाराने पुणे शहर हादरले. १८ वर्षीय आयुष गणेश कोमकर याची तीन गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही हत्या वनराज आंदेकर हत्याकांडाशी जोडली जात असून, आंदेकर टोळीने बदला म्हणून आयुषला टार्गेट केल्याचा संशय आहे. आयुषचे वडील गणेश कोमकर हे वनराज हत्याकांडातील मुख्य आरोपी असल्याने तुरुंगात आहेत. हत्येनंतर आयुषच्या आई कल्याणी कोमकर यांच्या भावनिक मुलाखतीने शहरवासीयांना हादरवले आहे. कुटुंब न्यायाची मागणी करत असताना, पोलिसांनी आंदेकर कुटुंबासह १३ जणांवर गुन्हा दाखल केला असून, सहा आरोपींना अटक झाली आहे.