

pune narayan peth
esakal
पुणे शहरातील नारायण पेठ परिसरात शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. पार्टी करून परतणाऱ्या चार तरुण-तरुणींच्या गटाने रस्त्यावर गोंधळ घातला. याच वेळी त्यांनी चालवलेल्या चारचाकी वाहनाने एका अपंग व्यक्तीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर संतप्त नागरिकांनी वाहन अडवले आणि चालकाला खाली उतरवून जाब विचारला.