Pune : वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी नारायणगाव पोलिसांची धडक कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

traffic jam

Pune : वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी नारायणगाव पोलिसांची धडक कारवाई

नारायणगाव : येथील पुणे- नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी नारायणगाव पोलिसांनीठोस कारवाई केली असून वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी दोन वाहन चालकावर गुन्हा दाखल केला असून पंधरा वाहन चालकांकडून साडेसात हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईचे चालक, वाहक व नारायणगाव ग्रामस्थांकडून स्वागत होत असून ही कारवाई तात्पुरती नसावी. अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

वाहतुक नियमांचे उल्लंघन करून येथील रस्त्यावरील इतर वाहनांना रहदारीस अडथळा होऊन लोकांचे जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य केल्या बद्दल मिनेश महीपत ठीकेकर (वय ४२, राहणार ठीकेकरवाडी ता. जुन्नर), संतोष दामोदर घेगडे( वय ४४, वर्ष रा. ओतूर ता. जुन्नर) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पंधरा वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी केली आहे.

नारायणगाव येथील पुणे नाशिक महामार्ग बसस्थानक चौक, खोडद रास्ता , बाजारपेठ रस्ता , जुन्नर व कोल्हेमळा रस्ता परिसरात वाहतुक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. येथील बसस्थानक चौकात नो पार्किंग झोन मध्ये मोठ्या प्रमाणात महामार्गाच्या लगत वाहने उभी केली जात आहेत.तसेच खाद्यपदार्थ स्टॉल लावले जात आहेत. बाजारपेठे व खोडद रस्त्याच्या लगत वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीत भर पडत आहे. याबाबत नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.पोलिसांनी कारवाई सुरू केल्याने एसटी बस चालकाकडून स्वागत होत आहे.

खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाईची मागणी : येथील बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ व चहा विक्रीच्या अनधिकृत हातगाड्या लागल्या आहेत.या मुळे वाहतूक कोंडी होत असून एसटी बस चालकाना त्रास सहन करावा लागत आहे.या पूर्वी एसटीच्या चाकाखाली सापडून जेष्ठ महिला मृत्यूमुखी पडली होती. संभाव्य अपघात टाळण्यासाठी बसस्थानक परिसरातील सर्व अनधिकृत विक्रते यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.