उत्तर प्रदेशात भाजपा ३२५ ते ३५० जागा जिंकेल - योगी आदित्यनाथ

भाजपा २०१७ पेक्षा जास्त जागा २०२२ मध्ये जिंकेल असे योगींनी म्हटले आहे.
Yogi-Adityanath
Yogi-AdityanathTeam eSakal

लखनऊ: "पुढच्यावर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (Uttar pradesh assembly election) सत्ताधारी भारतीय जनता पार्टी (Bjp) सहजतेने विजय मिळवेल" असा विश्वास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी व्यक्त केला आहे. भाजपा २०१७ पेक्षा जास्त जागा २०२२ मध्ये जिंकेल (win) असे योगींनी म्हटले आहे. "मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ३१२ जागा जिंकल्या होत्या. पुढच्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा ३२५ ते ३५० दरम्यान जागा जिंकेल" असा दावा योगींनी केलाय.

सुशासन, आर्थिक विकास आणि कायदा-सुव्यवस्था या आधारावर योगींनी हा दावा केला आहे. "सत्तेत परतण्याचा मला पूर्ण विश्वास आहे. मला उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरण चांगल्यापैकी समजतात. मागच्या २३ वर्षापासून मी उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रीय आहे" असे योगी म्हणाले. ते हिंदुस्थान टाइम्सशी बोलत होते.

Yogi-Adityanath
विवाहित महिलेसह प्रियकराची गावकऱ्यांनी काढली विवस्त्र धिंड

२६ सप्टेंबरला योगींनी त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करत सात मंत्र्यांना सामावून घेतले. यातून सामाजिक संतुलन आणि समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधीत्व दिल्याचं योगींच म्हणणं आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा पश्चिम युपीतल्या निवडणुकीवर परिणाम होणार नाही, असा दावा आदित्यनाथ यांनी केला. हा भाग भाजपाचा बालेकिल्ला समजला जातो.

Yogi-Adityanath
अश्विनने थेट विराटविरोधात BCCI कडे केली तक्रार? चर्चांना उधाण

पुढच्यावर्षाच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक होणार आहे. आतापासूनच या निवडणुकीचे पडघम वाजायला लागले असून सर्वच प्रमुख पक्षांनी तयारी सुरु केली आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक ८० जागा आहेत. केंद्रातल्या सत्तेचा मार्ग युपीतून जातो. त्यामुळे सर्वच पक्षांचा उत्तर प्रदेश जिंकण्याचा प्रयत्न असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com