

Bus-Truck Collision Near Manchar Leaves 22 Pilgrims Injured
sakal
मंचर : जखमींवर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून बहुतेकांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघात मंगळवारी (ता.११) रात्री साडेआठच्या सुमारास झाला. नंदी चौकातील गतिरोधकामुळे समोरील ट्रकचालकाने अचानक ब्रेक लावल्यानंतर मागून येणारी बस जोरात धडकली. धडकेचा जोर एवढा होता की बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून पुढील आसनांवरील भाविकांसह चालक गंभीर जखमी झाले.