
Pune Update
पिंपरी : ‘‘पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रिटीकरण संथगतीने होत आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. हे काम तातडीने पूर्ण करावे. तो पर्यंत महामार्गावरील तीनही टोल नाके बंद ठेवावेत,’’ अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.