

Six sheep were killed and three others seriously injured after a speeding pickup jeep rammed into a flock of sheep on the Pune–Nashik Highway near Kandali in Junnar taluka.
नारायणगाव : पुणे -नाशिक महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप जीपची धडक बसून सहा मेंढ्या ठार झाल्या असून तीन मेंढया गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर कांदळी या ठिकाणी घडली. या प्रकरणी चालक साहिल गणेश भुजबळ ( वय 25,रा.घारगाव, ता.संगमनेर) याला ताब्यात घेतले आहे. अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिली.