Pune: पुणे-नाशिक महामार्गावर कचऱ्याचे साम्राज्य; संतवाडी फाट्यावर दुर्गंधीने नागरिक हैराण, कारवाईची मागणी

Garbage Dumping Raises Health Concerns on Pune-Nashik Highway: पुणे-नाशिक महामार्गावरील आळेखिंड संतवाडी फाटा येथे रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने दुर्गंधी आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
Pune

Pune

esakal

Updated on

राजेश कणसे

आळेफाटा: पुणे- नाशिक या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आळे खिंड संतवाडी फाट्याजवळ रस्त्याच्याकडेला मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पिशव्यासह घनकचरा मोठ्या प्रमाणात टाकत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्याचा परिणाम म्हणून महामार्गावर सर्वत्र दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य आणि अनारोग्याचा धोका निर्माण झाला आहे. कचऱ्याच्या दुर्गंधीतून बहुतांश वाहनचालकांना तसेच स्थानिक नागरीकांणा खुप त्रास होत असल्याने या ठिकाणी नेमकं कचरा कोण टाकते याचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com