पुणे-नाशिक केवळ २ तासांत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

पुणे - पुणे-नाशिक हायस्पीड लोहमार्गाला मंजुरी मिळाली असून; प्रकल्पाचे काम फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सुरू करण्याचा प्रयत्न आहे. येत्या तीन वर्षांत हे काम पूर्ण होईल. या प्रकल्पामुळे पुणे ते नाशिक हे अंतर केवळ दोन तासांवर येणार असल्याची माहिती खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. 

आढळराव म्हणाले, २३१ किलोमीटरच्या या प्रकल्पाला सुमारे साडेसात हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी केंद्र आणि राज्य प्रत्येकी दीड हजार कोटींचा निधी देणार आहे. उर्वरित खर्च बॅंका, वित्त संस्थांच्या माध्यमातून उभा केला जाईल. प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून; उर्वरीत काम पुढील महिन्यात पूर्ण होईल. त्यासाठी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (महारेल) कंपनीची स्थापना केली आहे. याचे कार्यालयही मुंबईत सुरू करण्यात आले आहे. पुण्यातही कार्यालय सुरू करण्यासाठी जागेचा शोध सुरू आहे.’’

या प्रकल्पासाठी २००५ पासून प्रत्येक रेल्वे अर्थसंकल्पावेळी सातत्याने पाठपुरावा केला आहे. गुंतवणुकीच्या परताव्याची शाश्‍वती नसल्याने अनेकदा तो गुंडाळण्यात आला. परंतु, आम्ही पाठपुरावा सोडला नाही. २०१६ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी या प्रकल्पाला मंजुरी दिली. रेल्वे बोर्डाच्या तांत्रिक मंजुरीसाठी प्रकल्प पाठविण्यात आला असून; फेब्रुवारीच्या अखेरीस याचे काम सुरू होईल.
- शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार

मार्ग - पुणे जिल्ह्यातील वाघोली-आळंदी-चाकण-राजगुरुनगर-मंचर-नारायणगाव-नाशिक 
    २१ स्थानकांचा समावेश
    वेग - प्रतितास २२० किमी 
    दळणवळणाला चालना 
    शेतकरी, व्यावसायिकांना अधिक फायदा
    १३०० हेक्‍टर जमिनीचे होणार संपादन 

Web Title: Pune-Nashik in just 2 hours