Pune Nashik Railway : पुणे-नाशिक लोहमार्गाचा ‘नवा प्रवास’ ‘जीएमआरटी’मुळे मार्ग बदलला; रेल्वेमंत्र्यांची लोकसभेत माहिती
GMRT Impact on Rail Route : 'जीएमआरटी' (GMRT) प्रकल्पाला अडथळा होऊ नये म्हणून रेल्वे मंत्रालयाने प्रस्तावित पुणे-नाशिक हायस्पीड लोहमार्गाचा मूळ आराखडा रद्द केला असून, आता हा मार्ग 'जीएमआरटी' पासून १२ किलोमीटर दूर अंतरावरून सेमी हायस्पीड म्हणून विकसित केला जाईल.
पुणे : ‘जीएमआरटी’ला (जायंट मीटरवेव्ह रेडिओ दुर्बीण) बाधा निर्माण होत असल्याने रेल्वे मंत्रालयाने प्रस्तावित पुणे-नाशिक हायस्पीडचा लोहमार्ग रद्द केला. ‘जीएमआरटी’पासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावरून आता नवीन लोहमार्ग होणार आहे.