

Adhalrao Patil Opposes Change in Pune Nashik Railway Route and Supports All Party Protest for Development of Rural Areas
esakal
-डी.के.वळसे पाटील
मंचर : खेड, आंबेगाव व जुन्नर परिसराचा विकास साधायचा असेल तर पुणे–नाशिक रेल्वे मूळ मार्गानेच झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी पुणे–नाशिक रेल्वेचे शिल्पकार व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली आहे. या मागणीसाठी रविवारी (ता. ९) रोजी आयोजित सर्वपक्षीय आंदोलनाला माझा पाठिंबा राहील असे त्यांनी प्रसिद्ध पत्रकार द्वारे नमूद केले आहे.