esakal | पुणे- नाशिक रेल्वेबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे काय म्हणाले पाहा!
sakal

बोलून बातमी शोधा

Dr.Amol_Kolhe

उपमुख्यमंत्री पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे राज्याच्या वाट्याचे 3 हजार 208 कोटी आगामी पाच वर्षांत उपलब्ध करून दिले जातील.​

पुणे- नाशिक रेल्वेबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे काय म्हणाले पाहा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे- नाशिक मार्गावरील नियोजीत रेल्वे 2024 पूर्वी धावणार असल्याची ग्वाही खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज (ता.६) 'सकाळ'शी बोलताना दिली. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला असून संबंधित लोकप्रतिनिधींची लवकरच बैठक होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

- 'सारथी'तील विस्कळीत कारभाराबाबत मराठा संघटना काय म्हणाल्या पाहा!

रेल्वे मंत्रालयाने पुणे- नाशिक मार्गावरील सेमी स्पीड रेल्वेच्या प्रकल्प अहवालाला नुकतीच तत्त्वतः मंजुरी दिली आहे. आता राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने प्रकल्पाला मंजुरी दिल्यावर कर्ज प्रक्रियेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळ मंजुरी देईल. त्यानंतर प्रकल्पाच्या कामाला प्रारंभ होईल, असेही डॉ. कोल्हे यांनी स्पष्ट केले. ही रेल्वे पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणार आहे. या मार्गाशी संबंधित लोकप्रतिनिधींची बैठक उपमुख्यमंत्री पवार स्वतः घेणार आहेत. त्यात प्रकल्पाबद्दल सविस्तर चर्चा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

- स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला; परिस्थिती जाणून घ्या एका क्लिकवर

उपमुख्यमंत्री पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे राज्याच्या वाट्याचे 3 हजार 208 कोटी आगामी पाच वर्षांत उपलब्ध करून दिले जातील. त्यामुळे गेल्या 21 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पात 2024 पूर्वी ही रेल्वे नक्कीच धावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या मार्गावर सेमी स्पीड रेल्वे धावणार असली तरी प्रकल्प अहवालात 24 स्थानके निश्चित करण्यात आली आहेत. त्यावर त्यामुळे सर्व प्रवाशांच्या सोयीसाठी पॅसेंजर गाडीही या मार्गावर धावणार आहे.

तसेच मालवाहतुकीसाठीही विशेष व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या बाबत उपमुख्यमंत्री पवार यांच्या कार्यालयात या प्रकल्पाचे नुकतेच सादरीकरण करण्यात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पाची पुरेशी माहिती घेऊनच माजी लोकप्रतिनिधींनी या बाबत वक्तव्ये करावीत, असे आवाहनही ड़ॉ. कोल्हे यांनी केले. 

हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही; उपमुख्यमंत्र्यांचा रुग्णालयांना इशारा​

पुणे- नाशिक मार्गावरील रेल्वेसाठी सुमारे 1600 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यातील 40 टक्के रक्कम महाराष्ट्र सरकार व रेल्वे उभारणार असून उर्वरित 60 टक्के रकमेचे कर्ज उभारण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या मार्गावर पहिल्या टप्प्यात 6 डबे असतील व नंतर अनुक्रमे 12 आणि 16 डबे असतील. या गाडीचा वेग ताशी 200 किलोमीटर असेल. त्यामुळे पुणे- नाशिक हे अंतर किमान 2 तासांत नक्कीच पूर्ण होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image
go to top