Dilip Walse Patil : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग गतीने होण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीत ठराव

'पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग कार्यान्वित होण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत लवकरच बैठक होणार.
manikrao kokate, dilip walse patil and satyajeet tambe
manikrao kokate, dilip walse patil and satyajeet tambesakal
Updated on

मंचर - 'पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग कार्यान्वित होण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत लवकरच बैठक आयोजित करण्याचा ठराव मुंबई येथे सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.' अशी माहिती माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

मुंबई येथे मंगळवारी (ता. ४) पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाशी संबंधित असलेल्या पुणे, अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, आमदार अमोल खताळ व आमदार सत्यजीत तांबे बैठकीला उपस्थित होते.

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ऑनलाईन बैठकीत सहभाग घेतला. राजगुरूनगर-मंचर-नारायणगाव या सरळ मार्गने रेल्वेमार्ग व्हावा हा सर्वोत्तम पर्याय आहे. या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली.

'या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन हा विषय तातडीने चर्चेला घ्यावा, केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांच्यासोबतही लवकरच बैठक आयोजित करण्याचा ठराव घेण्यात आला.

या भागातील प्रवाशी व शेतीमालाच्या वाहतुकीसाठी रेल्वेमार्गाचे काम गतीने पूर्ण होण्यासाठी वेळोवेळी बैठका घेऊन राज्य शासनाच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाईल.' असे वळसे पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com