

Strong Demand to Retain the Old Pune–Nashik Semi Highspeed Rail Route
Sakal
चाकण : पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे हा मार्ग जुना राहावा. पुणे ते चाकण, खेड, आंबेगाव, जुन्नर तालुका मार्गे संगमनेर, सिन्नर, नाशिक असा जुनाच मार्ग राहावा अशी मागणी आहे. परंतु नव्याने पुणे अहिल्यानगर, शिर्डी - नाशिक अशा मार्गाची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे खेड, आंबेगाव ,जुन्नर संगमनेर, सिन्नर या तालुक्यातील नागरिकात असंतोष निर्माण झालेला आहे. यासाठी संगमनेर, सिन्नर तालुक्यातही बैठका घेऊन नवीन मार्गाला विरोध दर्शविण्यात आलेला आहे. पुणे ,चाकण, खेड, आंबेगाव, जुन्नर , संगमनेर, सिन्नर मार्गे नाशिकला हा मार्ग योग्य आहे कारण या मार्गामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील शेतीमालाच्या ने आण करण्याला, कंपनीच्या मालाची ने आण करण्याला तसेच आर्थिक विकासाला चालना मिळेल तसेच संगमनेर, सिन्नर भागाच्या विकासासाठी ही रेल्वे आवश्यक आहे.