Minor Assault Case Pune
esakal
पुणे : नसरापूर अत्याचार प्रकरणात जीव गमावलेल्या चिमुरडीच्या शरीरावर जखमा आढळून आल्या (Pune Nasrapur Case) असून, त्या जखमा टणक वस्तूने केल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले. त्या वस्तूबाबत चौकशी केली असता आरोपी समाधानकारक उत्तरे देत नाही. सीसीटीव्ही चित्रीकरणात आरोपीच्या हातामध्ये शेवेचा पुडा दिसत आहे. ती शेव त्याने कोठून खरेदी केली याबाबत विचारलेल्या प्रश्नांना तो उडवाउडवीची उत्तरे देत असून, तपासात सहकार्य करत नाही, अशी माहिती पोलिसांनी आज न्यायालयात दिली.