esakal | पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस कडून गॅस दरवाढीविरुद्ध निषेध आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

protest

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस कडून गॅस दरवाढीविरुद्ध निषेध आंदोलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बालेवाडी : येथील दसरा चौक येथे प्रभाग क्रमांक 9 राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी कडून सिलेंडर दरवाढीविरोधात केंद्र सरकारने केलेल्या आत्तापर्यंतच्या गॅस दरवाढीविरुद्ध चूल पेटवून निषेध व्यक्त केला. गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या महामारीने सगळेच अर्थचक्र बिघडले आहे. अनेक लोक बेरोजगार झाले आहेत. संसाराचा गाडा कसा चालवायचा हा बेरोजगारांसमोर मोठा प्रश्न असून, केंद्र सरकारकडून सातत्याने सिलेंडरची दरवाढ होत असून गेल्या दोन महिन्यातील आज तिसरी दरवाढ करून गॅसच्या किमती पंचवीस रुपयांनी वाढल्या आहेत.

तर दोन आठवड्यांच्या कालावधी मध्ये पन्नास रुपयांनी दरवाढ झाली आहे. "केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यानंतर 410 रुपये असलेल्या सिलेंडर 116 % दरवाढ होऊन त्याची किंमत आता 885 रु. वर पोहोचली आहे. एक जानेवारीपासून 190 रु. दरवाढ झाल्याचे," प्रा.रुपाली बालवडकर अध्यक्ष बालेवाडी वूमन्स क्लब यांनी सांगितले.

हेही वाचा: ‘आयटीआय’ची अंतिम गुणवत्ता यादी ४ सप्टेंबरला होणार जाहीर

फक्त गॅसच नाहीतर पेट्रोल-डिझेलच्या किमती दिवसेंदिवस गगनाला भिडत चालल्या असून जनसामान्यांसाठी हा दुष्काळात तेरावा महिना सारखीच परिस्थिती आहे. त्यामुळे मोदींनी आणि भाजपा नी दाखवलेल्या 'अच्छे दिन'चा धिक्कार आणि निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्र. क्र.9 कार्याद्यक्षा प्राची सिद्धिकी यांनी सांगितले. यावेळी प्रभाग क्रमांक 9 राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. डॉ. सागर बालवडकर,नितीन कळमकर, मीना विधळे,राखी श्रीवास्तव,माधुरी इंगळे,गुरूदास बालवडकर, भाऊसाहेब बालवडकर उपस्थित होते. महिला कार्यकर्त्यांकडून चुलीवर खिचडी शिजवून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.

loading image
go to top