Pune : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी राज्याची स्वतंत्र संहिता विकसित

महाराष्ट्रात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठीचे राज्याचे स्वतंत्र धोरण
National Education Policy
National Education Policy sakal

पुणे : राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करता यावी, या उद्देशाने राज्य सरकारने राज्य राज्य शैक्षणिक संहिता विकसित केली आहे. ही संहिता विकसित करण्यासाठी एक समिती नियुक्त कऱण्यात आली होती.

या समितीने राज्यातील शिक्षणविषयक ४०७ अध्यादेशांचा अभ्यास करून या अभ्यासाच्या माध्यमातून शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एक सप्तसुत्री (विविध सात घटक) केली आहे. या सप्तसुत्रीत ४२ कार्यघटक (टास्क) निश्‍चित करण्यात आले आहेत. या सप्तसुत्रीत शाळा नियमन, शाळा संचलन, शिक्षक, विद्यार्थी, अभ्यासक्रम मूल्यमापन आणि एमआयएस (मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम) या प्रमुख सात घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठीचे राज्याचे स्वतंत्र धोरण असावे, या उद्देशाने राज्य सरकारने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली राज्य अभ्यासक्रम आराखडा समन्वय समिती स्थापन केली होती. या समितीने धोरण अंमलबजावणीचे घटक आणि उपघटक निश्‍चित करण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने मागील ५७ वर्षात प्रसिद्ध केलेल्या विविध ४०७ अध्यादेशांचा अभ्यास करून ही राज्य शैक्षणिक संहिता विकसित केली आहे.

केंद्र सरकारने २०२० मध्ये देशाचे नवीन शैक्षणिक धोरण मंजूर केले आहे. देशातील सर्व राज्यांवर या नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचे बंधन आहे. त्यामुळे राज्य सरकारने ही अभ्यासक्रम आराखडा समन्वय समिती स्थापन केली होती. या समन्वय समितीने आणखी एका अभ्यासगटाची स्थापना केली होती. या समितीने व या अभ्यासगटाने सन १९६५ ते २०२२ या ५७ वर्षात शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या सर्व अध्यादेशांचा अभ्यास करून याबाबतचा अहवाल २४ जुलै २०२२ रोजी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडे सादर केला होता.

‘शिक्षण’च्या अध्यादेशांची वर्गवारी

  • - मागील ५७ वर्षात प्रसिद्ध झालेले एकूण अध्यादेश --- ४०७

  • - अभ्यासगटाने अभ्यास केलेल्या अध्यादेशांची संख्या --- ४०७

  • - एकूणपैकी नवीन शैक्षणिक धोरणांशी पूर्णपणे सुसंगत अध्यादेश --- २६१

  • - नवीन शैक्षणिक धोरणाशी पूर्णपणे असहमत अध्यादेश --- ३०

  • - नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी अंशतः सहमत असलेले --- ११४

  • - भाष्य करता येणार नसलेले अध्यादेश --- ०२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com