पुणे : मोफत जलद न्यायासाठी १२ मार्चला राष्ट्रीय लोकअदालत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

public court

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने शनिवारी (ता. १२) सर्व न्यायालयांमध्ये ‘राष्ट्रीय लोकअदालती’चे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे : मोफत जलद न्यायासाठी १२ मार्चला राष्ट्रीय लोकअदालत

पुणे - राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने शनिवारी (ता. १२) सर्व न्यायालयांमध्ये ‘राष्ट्रीय लोकअदालती’चे (National Public Court) आयोजन करण्यात आले आहे. न्यायालयात (Court) दाखल आणि दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली (Result) होण्यासाठी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.

या लोकन्यायालयामध्ये जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली विविध प्रकारची ४५ हजार पेक्षा जास्त प्रकरणे सामंजस्याने तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये तडजोडयोग्य फौजदारी, दिवाणी, मोटार अपघात नुकसान भरपाई, कामगार वाद, वीज, पाणी देयकांबाबतची प्रकरणे, वैवाहिक वाद, भूसंपादन विषयक, नोकरीबाबतची प्रकरणे, महसूल प्रकरणे तसेच इतर दिवाणी प्रकरणे घेण्यात आलेली आहेत.

हेही वाचा: पुण्यात युवासेनेच्या पदाधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला

तसेच, विविध बँका, वित्तीय संस्था तसेच दूरध्वनी विभाग, विद्युत विभाग आणि पुणे व पिंपरी महापालिका, पुणे जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायती यांच्याकडील प्रलंबित पाणीपट्टी, घरपट्टी देयके अशी सुमारे एक लाख ७५ हजारांपेक्षा जास्त दाखलपूर्व प्रकरणे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आल्याची माहिती सचिव प्रताप सावंत यांनी दिली.

जलद आणि मोफत न्याय

ज्या पक्षकारांना जलद आणि मोफत न्याय तसेच आपला वाद सामोपचाराने मिटविण्याचा इच्छा आहे, त्यांनी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अथवा संबंधित तालुका विधी सेवा समितीकडे त्वरित संपर्क साधावा. जिल्हा कार्यालयाचा मोबाईल क्रमांक ८५९१९०३६१२ असा असून इमेल आयडी dlsapune2@gmail.com असा आहे.

Web Title: Pune National Public Court On March 12 For Free Speedy Justice

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :puneJusticePublic Court