Pune: राष्ट्रीय कर परिषदेचे पुण्यात आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय कर परिषदेचे पुण्यात आयोजन

राष्ट्रीय कर परिषदेचे पुण्यात आयोजन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : फेसलेस करनिर्धारण पद्धतीचा अंगीकार करणे ही केंद्र सरकारने प्राप्तीकर कायद्यात केलेली क्रांतिकारी सुधारणा असून या पद्धतीत असणाऱ्या अनेक गुणवत्तापूर्ण वैशिष्ट्यामुळे प्राप्तीकर विभागाचा चेहरा मोहराच बदलून जाणार आहे. जगात सर्वात प्रथम लागू होणारी ही पद्धती भारतातील तंत्रज्ञ कंपन्या टीसीएस व इन्फोसिस यांनी विकसित केली आहे. यामुळे करदात्यांना प्राप्तीकर विभागाची पायरी चढण्याची वेळ येणार नाही. अशी माहिती सनदी लेखापाल डॉ. दिलीप सातभाई यांनी दिली.  

महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (एमटीपीए), ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्स (एआयएफटीपी), गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (जीएसटीपीएएम) आणि नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (एनएमटीपीए) यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय कर परिषदेच्या पाचव्या पुष्पात ते बोलत होते. भारतातील विविध राज्यातील साडे चारशे करसल्लागार या राष्ट्रीय परिषदेत भाग घेतला. एमटीपीएचे अध्यक्ष चितळीकर व राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र सोनावणे या प्रसंगी उपस्थित होते.

हेही वाचा: ST Strike : कधी-कधी शिळे अन्न खाऊनच दिवस काढतो

डॉ सातभाई म्हणाले,‘‘कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित असणारी ही पद्धती संपूर्णपणे कोणत्याही कारणाद्वारे मनुष्य संपर्क न येता कार्यवाहीत येणार असल्याने करदात्यांसाठी ते सोयीचे ठरणार आहे. करनिर्धारण फेसलेस होणार असल्याने सर्व पत्र व्यवहार इलेक्ट्रॉनिक माध्यमातूनच होणार आहेत. त्यामुळे करदात्यांनी ही आता सावध असायला हवे. माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम १३ अंतर्गत इमेल द्वारे देण्यात येणारी संदेश यंत्रणा पुराव्याच्या दृष्टीने आता महत्त्वाची ठरणार आहे.’’

loading image
go to top