

Governor Devvrat Warns Against Chemical Farming
Sakal
पुणे : ‘‘रासायनिक शेती पद्धत पाश्चात्त्य देशांकडून आलेली आहे. एकेकाळी भारतीय जमिनीत सेंद्रिय कार्बनची मात्रा सुमारे १.५ टक्के होती, ती आता ०.५ टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. जमिनीच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला हा घटक कमी झाल्याने जमिनी पडीक पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच रासायनिक शेती खर्चिक असल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहेत,’’ असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.