

IIT Delhi to Study Navale Bridge
Sakal
पुणे : नवले पूल परिसरातील वाढते अपघात लक्षात घेता, या धोकादायक भागाचा तांत्रिक अभ्यास व तपास करण्यासाठी आता ‘आयआयटी दिल्ली’ची (भारतीय तंत्रज्ञान संस्था) मदत घेतली जाणार आहे. या संदर्भात रस्ते सुरक्षा समितीने निर्देश दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या एक ते दोन दिवसांत ‘आयआयटी दिल्ली’ला मसुदा पाठविण्यात येणार आहे.