

Navale Bridge Accident: Minister's Inspection
Sakal
पुणे : ‘‘नवले पूल येथे झालेला अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. असा प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. जर यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव दिसल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल,’’ असा इशारा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिला. दरम्यान, जांभूळवाडी ते रावेत उन्नत मार्गाच्या प्रस्तावाला गती देण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.