

Pune Navale Bridge Accident
Sakal
पुणे : कात्रज नवीन बोगद्यापासून नवले पुलापर्यंतच्या उतारावर दरवर्षी जीवघेणे अपघात होत असताना प्रशासन मात्र गाढ झोपेत आहे. मागील तीन वर्षांत या मार्गावर झालेल्या अपघातांमध्ये शेकडो लोक गंभीर जखमी झाले, तर कित्येक नागरिकांचा बळी गेला. कोट्यवधी रुपये खर्च करून ‘सुधारणा’ झाल्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केवळ कागदी घोडे नाचवण्याचे काम केले आहे. आता या निष्काळजी, बेजबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी संतप्त मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.