Pune Navale Bridge accident
esakal
पुणे
Pune News : नवले पुलावर अपघाताची मालिका थांबेना! पहाटे स्कूलबस कारला धडकली अन्...; Video समोर
Pune Navale Bridge Accident : या अपघातात दोघे जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
नवले पुलावर अपघाताची मालिका सुरुच आहे. याठिकाणी आज पुन्हा एकदा अपघात घडला आहे. यावेळी स्कूल बसने कारने धडक दिली आहे. नवले पुलावरील ब्लॅक स्पॉटवर हा अपघात घडला असून या अपघातात दोघे जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातामुळे वाहतूक कोंडीही बघायला मिळली आहे.
