

PMC Disaster Management Swings into Action
Sakal
पुणे : नवले पूल येथे गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातानंतर पुणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. तीन वाहनांना आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन विभागाची तीन फायर इंजिन, दोन रेस्क्यू व्हॅन, तसेच ‘पीएमआरडीए’च्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.